Rajya Sabha result | राजसभेच्या निकालानंतर नेत्यांनी एकमेकांवर तोफ डागली | Sakal Media |

2022-06-11 17

राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडलं. यासाठी सात उमेदवार रिंगणात होते. भाजपाचे पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तिघेही उमेदवार निवडून आले तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी देखील निवडून आले आहे. इथे शिवसेनेला मात्र धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार या निवडणुकीत पराभूत झाले असून संजय राऊतांना अगदी निसटता विजय मिळाला आहे. या पराभवावरून महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसल्याच दिसतंय. दरम्यान आघाडीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांनी आपली हार मान्य करत त्यावर आपलं म्हणणं देखील मांडलय.
#rajyasabhaelections2022 #BJP #Shivsena #NCP

Videos similaires